घाटलाडकी गावाचे भौगोलिक स्थान हे सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी व चारगड नदी काठी आहे. तसेच घाटलाडकी हे गाव चांदूर बाजार या तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे १८ किलोमीटर लांब आहे. गावाच्या विकासामध्ये भौगोलिक परिस्थितीचा सिंहाचा वाटा असून येथील ८०% लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. तसेच प्रमुख पिके संत्रा,कापूस तूर,सोयाबीन इ. असले तरी संत्रा हे पिक गावाच्या विकासाचा कणा आहे. आणि जवळच चारगड व विसरोडी हे महत्वाचे धरण आहे.
गावाचे ग्रामदैवत श्री. संत तुळसा माता असून चारगड नदीकाठी मातेचे भव्य मंदिर आहे. दरसाल जाने-फेब्रु मध्ये तुळसामातेची भव्य मोठी यात्रा असते. तसेच अंबा माता हे सुद्धा इतिहासिक मंदिर असुन येथे दर वर्षी श्रावण महिन्यात विशेष पूजेचे आयोजन केले जाते. घाटलाडकी येथील बाजारपेठ हि इतिहासिक बाजारपेठ आहे. तसेच काही काळ येथे इंग्रज लोकांचे वास्तव असल्याची इतिहासात नोंद आहे. स्वतंत्र सैनिक श्री. श्रीरामजी राऊत यांची कर्मभूमी आहे. “कस्तुबा सूतिका गृह” हा इतिहासिक दवाखाना आजही लोकांच्या सेवेत कार्यरत आहे. गावात असलेल्या विविध इतिहासकालीन मंदिरे,वास्तू इ. मुळे आजही गावाला वेगळी संस्कृतीक ओळख निर्माण झाली आहे.
एकात्मिक आणि सर्वसमावेशक गावाचा विकास करणे ज्यामध्ये उत्तम आरोग्य, दर्जेदार शिक्षण, स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा, मजबूत पायाभूत सुविधा पर्यावरणाचे संवर्धन, महिलांचे सक्षमीकरण, युवकांना नवीन संधी उपलब्ध, आणि प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जीवन जगण्याची समान संधी मिळेल. यामध्ये गावातील वंचित घटकांना प्राधान्य देऊन त्यांना मदत करून “स्वच्छ, सुंदर, समृद्ध आणि आत्मनिर्भर" ग्राम निर्माण करणे.
घाटलाडकी ग्रामपंचायतची स्थापना सन 1963 मध्ये झाली आहे. आणि सन २००८ मध्ये पुर्नवसित गाव चुर्नी व वैराट आणि सांभोरा (आदिवासी गाव) यांचा घाटलाडकी ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट झाल्यामुळे ग्रामपंचायतचा विस्तार झाला आहे. ग्रामपंचायतचे पहिले सरपंच श्री.केशवसिंह पवार होऊन गेले आहे. ग्रामपंचायतचे घोषवाक्य “गावाचा विकास देशाचा विकास” हे असून ग्रामपंचायत गावांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यात सदैव प्रयत्नशील आहे. हागणदारी मुक्त गाव,तंटामुक्त गाव,डिजीटल गाव, अशा विविध प्रकारच्या योजना/कार्यक्रम/उपक्रम राबवून गावाचा विकास साधण्यात ग्रामपंचायतने प्रयत्न केले आहे. घाटलाडकी ग्रामपंचायत हि विकासात्मक दृष्टीकोण ठेवून गावाच्या विकासाच्या चळवळीत सदैव कार्यरत आहे. तसेच गावाचा सर्वांगीण विकास करणे हे ग्रामपंचायतचे मुख्य उद्देश आहे. विकासात्मक कार्य करून ग्रामपंचायतचे नाव इतिहासाच्या सोनेरी पटावर नोंदविण्यात प्रत्यनशील आहे.
ग्रामातील प्रत्येक नागरिकाला शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण इ. मूलभूत सोयी पुरवणे. तसेच शासनाच्या सर्व योजना पारदर्शकपणे राबवून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे. ग्रामातील युवकांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन आणि हरितग्राम असे उपक्रम राबवून ग्रामांचा विकास करणे. ग्रामपंचायतीचे प्रशासन डिजिटल पद्धतीने सक्षम करून लोकभिमुख करणे.
पारदर्शकता :
ग्रामपंचायतीच्या सर्व कामांमध्ये पारदर्शकता आणून
“डिजिटल ग्रामपंचायत” सारख्या उपक्रमातून लोकाभिमुख करणे.
लोकसहभाग :
ग्रामसभेच्या माध्यमातून सार्वजनिक निर्णय आणि प्रक्रियेमध्ये
जनतेचा सक्रिय सहभाग घेणे, ज्यामध्ये लोकांचे विचार, गरजा
आणि मूल्ये इ. अधीन राहून गावाचा विकास करणे.
जबाबदारी :
ग्रामपंचायतीच्या निर्णय, कृती, कार्य इ. ची योग्य प्रकारे
अंमलबजावणी करून गावाच्या विकासाला गती देणे.
समानता :
नागरिकांना समान संधी व न्यायिक अधिकार देणे तसेच
वंश, धर्म, लिंग किंवा इतर कोणत्याही कारणास्तव
कोणताही भेदभाव न करणे.
स्वच्छता व पर्यावरण संवर्धन :
नैसर्गिक संसाधनांचा योग्य उपयोग करून पर्यावरणाचे
संतुलन राखणे व स्वच्छ व हरित ग्राम निर्माण करणे.
प्रामाणिकपणा :
प्रत्येक कार्यात प्रामाणिकपणा, नीतीमत्ता आणि
सार्वजनिक हिताची भावना जपणे.
नवीन उपक्रम व नावीन्य :
आरोग्य, शिक्षण, शेती, स्वच्छता व सामाजिक-आर्थिक
बाबींचा विचार करून उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर
करून गावाच्या विकासाला गती देणे.
सेवाभाव :
नागरिकांप्रती प्रेम, सहानुभूती, सहवेदना व
एकात्मतेची भावना ठेवून निःस्वार्थपणे कार्य
करून लोकाभिमुख सेवा पुरवणे.